स्व. खा. बाळासाहेब आपटे यांचा जीवनपट (१९३९ – २०१२)

 
स्व. खा. बाळासाहेब आपटे यांचा जीवनपट (१९३९ – २०१२)
संपूर्ण नाव : प्रा. अॅड. बळवंत परशुराम आपटे एम. ए. , एल. एल. एम.
आपटे वाडा, राजगुरुनगर. ता. खेड, जि. पुणे. येथे जन्म. (दि. १८ जाने. १९३९)
वयाच्या बाराव्या वर्षी ‘साहित्य प्राज्ञ’ हि बी.ए. पदवीशी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. (१९५१)
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. (१९५४)
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण. (१९५७)
मुंबई येथून रुईया महाविद्यालयातून बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण. (१९५९)
मुंबई येथूनच एम. ए. परीक्षा उत्तीर्ण. (१९६१)
मुंबई येथून एल.एल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण. (१९६२)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यास सुरुवात. (१९६३)
मुंबई येथे एल.एल.एम. ची परीक्षा उत्तीर्ण. (१९६४)
दादर, मुंबई येथील न्यू लाॅ कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम. (१९६५)
अंतर-राज्य छात्र जीवन दर्शन या राष्ट्रीय प्रकल्पाची मुहूर्तमेढ. (१९६६)
निर्मला धारप यांच्याशी विवाहबद्ध. (२८ फेब्रु. १९६५)
कन्या जानव्ही हिचा जन्म. (१९६८)
मुंबई येथील अ.भा.वि.प. च्या रौप्य महोत्सवी अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड. (१९७४)
आणीबाणी काळात नाशिक येथील कारागृहात असताना ‘Educational Change’ या पुस्तकाचे लिखाण. (१९७५)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘सावरकर समता ज्योत यात्रा’ आयोजन. (१९८२-८३)
आंतरराष्ट्रीय युवक वर्षी युवा ज्योत यात्रा चे आयोजन. (१९८३)
विश्व विद्यार्थी संघटना या जागतिक मंचाच्या स्थापनेत ओउधाकार. (१९८५)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर प्रश्नात समन्वयाची भूमिका. (१९९०)
Advocates Association of Western India ह्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड. (१९९१)
कन्या डॉ. जानव्ही याचं गिरीश केदारे यांच्याशी विवाह. (१९९५)
दोन वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवड. (२००० व २००६)
भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय उपाध्याक्षक पदी निवड. (२००७)
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मीमांसा करणारे टिपण - Task Ahead चे सादरीकरण. (२००९)
मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये फ्फुफुसाच्या आजाराने देहावसान.(१७ जुलै २०१२)