दादासाहेब आणि खेड अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक !
दादांचे दुसरे अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे खेड अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना. सहकारी बँकेची स्थापना करण्याचे पर्यत्न त्यावेळी अनेकांनी केले होते. मात्र तत्कालीन ब्रिटीश कलेक्टरने दादाा आपटेंच्या अर्जालाच मंजूरी दिली. किमान 11 सभासद त्यासाठी आवश्यक होते. आवश्यक तेवढ्या रकमेचे भाग खरेदी करु शकणारे सात सदस्य उपलब्ध झाले. मग चार सभासदांचे पैसे दादांनी स्वतः भरले. बँक सुरु झाली ती आपटे वकीलांच्या वाडातच. वकिली कचेरीच्या ओटीवरच बँकेचा एक डेस्क मांडला गेला. आपटे वाड्यात एकाच वेळी वकिलीचा, शाळेचा आणि नागरी सहकारी बँकेचा असे तीन डेस्क सुरु झाले.
अर्बन बँक !
एक विचार जो मोठा असतो तसाच तो जर संस्कारिक, समाजभिमुख व व्यापक जनहिताच्या दृष्टीने प्रत्यक्षात उतरविण्याचा चंग बांधला तर काय होऊ शकते याचे अनेक मूर्तिमंत उदाहरणे आहेत. जे आजच्या अनेक भव्य दिव्या व महत्वाच्या समजल्या जाणार्या संस्था व संघटना रचना अथवा शहरांच्या मुळात किंवा गाभ्यात दडलेल्या आहेत. याच आशयाचे एक मूर्तिमंत साक्षात प्रतिक म्हणजे माननीय परशुराम तथा दादासाहेब आपटे होय.
गोष्ट १९२२ ची, त्या वेळच्या भव्य विचार व व्यक्तींची श्री परशुराम भागीरात आपटे या भव्य विचारांनी प्रेरित होऊन उच्च शिक्षण प्राप्तीनंतर मिळालेली तशीच उच्च सरकारी पोष्टातील नोकरीचा राजीनामा देऊन तेव्ह्चे खेड म्हणजेच राजगुरुनगर येऊन दाखल झाले होते. ‘हायकोर्ट प्लीडेर’ चे शिक्षण पूर्ण झाल्या नंतरही डोक्यातील विचार व आपल्या मातीची ओढ दादासाहेबांना शांत बसू देत नव्हती. प्रेरणा देणार्या विचारांची श्रुंखला घेऊन खेड मध्ये दाखल झालेले दादासाहेब एक स्वप्न उराशी बाळगून होते. आपल्या गावामध्ये एक माध्यमिक शाळा असावी ज्यात आपल्या खेडमधील भावी पिढी शिक्षित व सुसंस्कारित होईल. दुसरे म्हणजे एक गावाच्या पातळीवरील निर्मल व स्वच्छ आरोग्यदायी सार्वजनिक पाणी पुरवठा यंत्रणा असेल. तसेच ‘एक गावपण’ म्हणून गाव्वामध्ये आपली अशी म्हणावे असे पतसंस्था अथवा तत्सम पात निर्माण करणारी यंत्रणा किंवा देवाण घेवाण व अडचणीच्या वेळेस मदत म्हणून सहकारी बँक असावी. या तीन स्वप्नांच्या पूर्तीसाठी दादासाहेब अहोरात्र कार्यरत राहिले व अखेर पर्यंत टिकून राहावे म्हणून झटले.
बँक म्हणून मुहूर्तमेढ ठेवणे तसे म्हटले तर सोपे व सहज गोष्ट पण त्याचे एक अपत्य म्हणून जतन संगोपन व वृद्धी हि निर्लाभ वृत्तीने पुढे नेणे तसे अवघडच. शिवाय या दृष्टिकोनाचे पुढील युवा व भावी पिढीवर संस्कार करणे हे एक मोठेच आव्हान. त्यात सर्वात महत्वाचे स्थान विस्श्वास आणि संयम याना असते. बँकेचे हे बीज लावण्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यात कोणीही पुढारी नाही, अर्थशास्त्रज्ञ नाही, अधिकारी वा सहकारी कार्यकर्ता नाही. आर्थिक दृष्ट्या हि प्रवर्तक मंडळी सामान्य जनातेपैकीच. अशी सर्वसाधारण परिस्थिती असतांना देखील या बँकेची स्थापना झाली.
बँकेच्या कार्यकर्त्यांत भिन्न मतांची आणि पंथाची माणसे वेळोवेळी आली. तरीही या आर्थिक संस्थेचे काम करताना वैयक्तिक आशा आकांक्षा, सत्तास्पर्धा आणि स्वार्थ कार्यकर्त्यांनी ह्या बँकेच्या व्यवहारात कधीही येऊ नाही दिला. सहकार हा स्वहाकारात विलीन होण्याची शक्यता, परंतु त्यापासून सतत अलिप्त राहून संस्थेचे संगोपन झाले. तसेच तिच्या निकोप वाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले. त्यामुळे हे यश फार मोठे व मोलाचे हे विसरून चालणार नाही.
सहकार सहयोग व सहकार्य हि भारतीयांचीच नव्हे तर समस्त मानाव्मात्रांची मुल्प्रेराना, आंतरिक धारणा आहे. रानाती अवस्थेपासून आजपर्यंत मानवाची जी उत्क्रांती झाली जो विकास झाला, प्रगती झाली ती या धारानेमुलेच. गतिशील जीवनाचा पाया सहकार्यांच्या व सहविचारांच्या श्रेष्ठातेत दडलेला आहे. मानवी जीवनाची मानसिक संपन्नता व ऐहिक समृद्धीही सहयोगानेच साधली जाते. पारलौकिक हिताचा विचार दूर ठेवला तरीही मानवी जीवन सहजीवनच्या आधारेच मोठे झाले आहे. अनादिकालापासून माणसाची जगण्याची धडपड जशी कायम आहे तशीच ती सुखासमाधानाने जगण्याचा प्रयान्तही अनादी आहे. स्वस्थ वा स्वास्थ्य जीवनाला मूलतः आर्थिक मनाचे समाधान पाहिजे असते. ते प्राप्त व्हावे म्हणूनच मानसे प्रयत्नवादी बनतात. विचारंचे आणि प्रयात्नाशिलातेचे सातत्याच माणसाला सुख मिळवून देते.
इ. स. १९३० च्या आर्थिक मंदीचा झळ भारतीयानाही बसली होती. आर्थिक अरीष्टन्च्या भोवर्यात भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान झाली होती. भाजारातील भीषण नाणे टंचाई मुळे वस्तूंचे मोल कवडीमोल झाले होते. जनतेची स्थिती सांपत्तिक दृष्ट्या परावलंबी कष्टाची व जीकारीची होती. गरज पूर्तीचे सावकाराशिवाय अन्य साधन न उरलेले. अशा परिस्थितीत मध्यम व कनिष्ठ वर्गीयांचे आर्थिक शोषणास सीमा नव्हती. अशा ह्या गंभीर प्रतिकूल परस्थितीत या छोट्याशा नगरीत समविचारांच्या किरणांनी प्रवेश केला. आणि पाहता पाहत त्याची जागा प्रकाशाने घेतली. मध्यम व कनिष्ठ वर्गातील गरजूंना आर्थिक सहाय्य योग्य व्याजाचे दराने उपलब्ध व्हावे , व्यापार उद्योगांना चालना मिळावी, धनसंचय वृत्तीत वाढ व्हावी व संचयित धन आपत्तीकाली कमी यावे यासाठी संचयित धन बँकेत ठेवले जावे याच उद्देशाने खेडमधील श्री. परशुराम भगीरथ आपटे(वकील), पै. कदर अम्बुभाई आतार, कै. काशिनाथ गंगाराम होनराव, कै. धोंडू बाळा तेली इत्य्स्डी विविध क्षेत्रातील व जाती-जामातीतील प्रभूतीनी एकत्र येऊन बँक स्थापनेची खटपट केली व त्यातूनच या बँकेची निर्मिती झाली. आज जिचे नामाभिदान ‘राजगुरुनगर सहकारी बँक लि.’ असे आहे ती हि बँक बंबे को-ऑप. सोसायटी अॅक्ट नागरी सहकारी बँक म्हणून दि. १९ जून १९३१ रोजी रजिस्टर नं. ७०१६ ने नोंदली गेली. संस्थेच्या उद्घाटन समारंभ दि. १२ जुलाई १९३१ रोजी श्री. भालचंद्र महेश्वर गुप्ते यांचे शुभहस्ते पुणे सेन्ट्रल को-ऑप. बँक ली. खेड शाखेच्या कार्यालयात झाला.
