स्वर्गीय श्री. परशुराम भगीरथ आपटे - सामाजिक कार्य !
स्वर्गीय बाळासाहेबांचे वडील हे एक बुध्दीमान आणि अतिशय हुशार असे व्यक्तीमत्व होते. ते दादासाहेब या नावाने सर्वत्र परिचीत होते. स्वर्गीय दादासाहेब राजगुरूनगरचे (खेड) पहिले सरपंच होण्याचा मान (सन १९२२ ते सन १९३०) या कालावधीमध्ये मिळाला. याच काळात दादांनी जनतेच्या अर्थकरणाची गरज ओळखुन आपल्या राहत्या आपटे वाड्यामध्ये दिनांक ६१९/०६/१९३१ रोजी खेड अर्बन बँकेची स्थापना केली. तसेच सन १९३८ रोजी स्थापना झालेल्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीत पहिले मानद सचिव म्हणून दादांनी पव भुशविले आणि शाळा सुरू करण्यासाठी आपल्या वाड्यातील काही खोल्या वर्ग म्हणून उपलब्ध करून दिल्या. गावामध्ये दादांनी पहिली वॉटर स्किम आणली आणि गावातील पहिली विजही आपटे वाड्यात तिाा प्रयोग सुरू करणे बाबत ते यशस्वी ठरले. सन 1918 साली लोकमान्य टिळक गावामध्ये दिक्षीत वाड्यात आले होते. त्यावेळी दादा आपट्यांनी लोकमान्यांच्या जाहिर सभेचे नेतृत्व केले होते. त्याच जाहिर सभेत लोकमान्यांच्या सभेस हजर राहिलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हा युवक पुढे देशासाठी स्वातंत्र्य संग्रामात लढला आणि त्यांनी दिनांक २३ मार्च १९३१ साली देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्मा राजगुरूंच्या स्मृती प्रित्यर्थ खेड ह्या गावाचे नाव पुढे राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.
बाळ आपटे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना आपटे कुळाचे आणखी एक वैशिष्ठ्य नमूद करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. कायद्याच्या क्षेत्रातील नेपुण्य हा आपटे कुलपरंपरेच्या अध्यात्मिक मानसिकतेचा, धर्मपरायणतेचा आणि पांडिताचाच एक भाग होता असे म्हटले पाहिजे. मंदिरांची उभारणी सर्व धार्मिक उत्सवामध्ये भरीव योगदान, सामाजहिताच्या विविधांगी कार्यात पुढाकार हे आपटे कुटुंबाचे पिढीजात वैशिष्ट्य.
दादासाहेबांनी खेडमध्ये व्यतीत केलेले जीवन हा समाजहितैषी जीवनाचा एक उत्कृष्ठ आदर्श ठरावा. त्याची वकिली उत्तमच चालत होती. खेड तालुका न्यायालयाच्या प्रकरणांपैकी निम्मी अधिक प्रकरणे दादासाहेबांकडेच होती. मात्र वकिली व्यवसायाच्या व्यस्ततेत मग्न असतानाही अन्य अनेक सामाजिक उपक्रमांकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा सतत कटाक्ष असे. संबंध खेड गावाला वीजेचा आणि पाण्याचा पुरवठा सुरु व्हावा यासाठी आवश्यक तो दीर्घकालीन पाठपुरवठा त्यांनी केला.
गावात प्राथमिक शाळा नव्हती, इंग्रजी चौथीपर्यंत शिकल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जुन्नरला जावे लागे. यामुळे स्वाभाविकच अनेकांचे विशेषतः मुलींचे शिक्षण चौथ्या इयत्तेतच थांबत असे. दादांनी गावात माध्यमिक शाळा सुरु करण्यात पुढाकार घेतला. खेड एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापन केली. १९३८ साली खेड मध्ये इंग्रजी पाचव्या आणि सहाव्या इयत्तेचे वर्ग सुरु झाले. आपटे वाड्यात दोन तर शेजारीच असलेल्या देशपांडे वाड्यात दोन वर्ग भरत. पुढे चार वर्षांनी शाळेची इमारत उभी राहिपर्यंत शाळा आपटे वाड्यातच भरत होती. १९३८ ते १९५४ अशी तब्बल सोला वर्षे दादा आपटे शाळेचे मानद सचिव होते.
दादासाहेब धार्मिक विचारणा कमी लेखात नव्हते. पण समाजाला आज कशाची गरज आहे हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक प्रयत्नांतून एकात्मता यावी यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा लोकमान्य होती. आपले विचार कृतीत आणले तरच त्या विचारांशी आपण निष्ठावान आहोत अशी त्यांची धारणा होती. म्हणून बेगडी देशाभाक्ती त्यांनी कधी केली नाही. आणि विचारांचे प्रदर्शन करून स्वार्थ साधला नाही. आपल्याला प्रमानिकापणाने जे पटत ते निर्भयपणे ते करीत.
