अॅड. आदरणीय बाळासाहेब आपटे - राजकीय

विद्यार्थिदशेपासून सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्या आपटे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून कार्य सुरू केले. त्यांनी या संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले होते. शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवर त्यांनी सुमारे २० वर्षे काम केले. विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. आपटे यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती. बाळ आपटे यांनी २००२ ते २००६ या कालावधीत राज्यसभेत खासदार म्हणून चमकदार कामगिरी केली. ते राज्य तसेच केंद्राच्या विविध योजना आणि मंडळांवर सदस्य म्हणून कार्यरत होते. देशात १९७५ मध्ये जारी झालेल्या आणीबाणीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यांनी अनेक देशांचे दौरे केले होते. त्यांची "यशवंत', "हिंदुत्वाबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका' आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत

वयाच्या ६१ व्या वर्षी कार्यकर्ता ह्या नात्याने राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी तरूण वयापासून यशस्वीपणे आणि अतिशय अभ्यासू वृत्तीने संघटनात्मक पध्दतीने निस्वार्थी हेतूने पार पाडत असतांना. बाळासाहेबांना भारतीय जनता पार्टीने एप्रिल २००० मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून पाठविले. त्या संधीचे सोने करीत. बाळासाहेबांनी संसदेच्या माध्यमातून अनेक अभ्यासू आणि विकासात्मक असे विषय आखून संपुर्ण देशभरात विकासाचे अनेक प्रकल्प राबविले.

महाराष्ट्रातून बाळासाहेबांना १२ वर्षे राज्यसभेच्या खासदारकीची संधी त्यांच्या अतिशय हुशार, निस्वार्थी, संघटनात्मक आणि कार्यकुशल अशा कर्तुत्वातून संघटनेनेच त्यांना बहाल केली. त्यांच्या खासदार विकास निधीतून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकत्यांनी आपापल्या भागामध्ये बाळासाहेबांनी खासदार विकास निधी कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर बाळासाहेबांनी तो तप्तरतेने उपलब्ध करून दिला. हे देशव्यापी समाज कार्य करीत असतांना बाळासाहेबंानी आपल्या राजगुरूनगरच्या मातृभुमिला विविध अंगी विकास कार्याने सजविले आहे. स्वत:च्या खासदार विकास निधीतून त्यांनी सन २००१ साली राजगुरूनगर शहरामध्ये सर्वत्र डांबरी रस्ता, शाळा कॉलेजसाठी ईमारत व संगणक शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला. रामघाट परिसर सुधारणा व भिमानदीवरील संरक्षक भिंत श्री केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बाळासाहेबांच्याच फंडातून बांधण्यात आली. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती ती गैरसोय बाळसाहेबांनी गावची गरज ओळखून गावातील अनेक भागात नविन पाईप लाईनसाठी सुध्दा निधी उपलब्ध करून दिला. बाल गोपाळांसाठी अंगणवाडीसाठी वर्गखोल्या तसेच अनेक ठिकाणी स्वच्छता गृहे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिले. मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असतांना सन १९९५ साली बाळसाहेबांच्या शिफारशीवरूनच गावामध्ये जिवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना आली. तसेच खेड तालुक्यातील अनेक गावामध्‌ये रस्ते, पिण्याचे पाणी योजना स्कीम, सार्वजनिक वाचनांलय, अनेक शाळांना ईमारत व संगणक निधी बाळासाहेबांनी आपल्या खासदार निधीतून मिळवून दिला. हे सर्व काम करीत असतांना बाळासाहेब आणि त्यांचे कुटुंबिय नेहमी प्रसिधी आणि सत्कार ह्यापासून दूर राहिले. जनतेचाच पैसा जनतेपर्यंत पोहोचवीने हेच माझे कार्य आहे आणि ह्या दोघांमधील मी एक पाईप लाईन आहे असे बाळासाहेब नेहमीच भाषणांत सांगत असत हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट म्हणता येईल.

एप्रिल २०१२ मध्ये राज्यसभेच्या खासदारकीची येणारी तिसरी संधी मात्र बाळासाहेबांनी स्वत:हून नाकारली. जास्तकाळ त्यांच पदावर रहाणे त्यांनाच पसंत नव्हते. ही खासदारकीची संधी पक्षातील दुसर्‍या कोणत्याही कार्यकर्त्याला द्यावी असे त्यांनी स्पष्टपणे सांगीतले व संघटनेसाठीच पुढील कार्य माझे चालू राहील असे बाळासाहेबांनी कार्यकत्यांना अवर्जुन सांगीतले.