आठवणी मान्यवरांच्या !

मोहन भागवत | सरसंचालक, रा.स्व.संघ

हिंदू समाज संघटीत आणि उन्नत व्हावा या ध्येयासाठी प्रा. बाळासाहेब आपटे यांनी त्यांचे आयुष्य समर्पित केले. राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी आवश्यक असणारे अनुशासन त्यांनी आयुष्यभर पाळले आणि इतरांनीही ते पाळावे याकरिता ते आग्रही राहिले. अर्थात बाळासाहेबांची सगळ्यात पहिल्यांदा आठवणारी गोष्ट म्हणजे त्यांनी स्पष्टपणे वा कधी परखडपणे केलेले मैत्रीपूर्ण मार्गदर्शन. ज्या मार्गदर्शनामुळे अनेकांना दिलासा, स्थिरता आणि प्रेरणा मिळाली.

मान्यवरांचे बोल !

  • "श्री. बाळ आपटे असे एक प्रख्यात संसदपटू आणि राजकीय नेते होते ज्यांना लोककल्याणाची निरंतर जाणिव होती आणि त्याकरिता ते विविध मंचावर अथकपणे कार्यरत राहिले. ते विख्यात वकील आणि नावाजलेले शिक्षणतज्जही होते. "

  • "बाळासाहेब, याच नावाने ते वकीलवर्गात ओळखले जात. साधेपणा, विन्रमता आणि वास्तवाचे नित्य भान ही त्यांची वैशिष्टे होती. ते स्वत: वरिष्ठ वकील असले तरी काही वरिष्ठांकडे असणारा उद्दामपणाचा त्यांना स्पर्शही नव्हता. ते सर्वांशीच विशेषत: ज्युनइर वकिलांशी आदराने वागत. त्यांच्या अशा चंगुलपणाचा मी प्रशंसक होतो. आपल्या सर्वांनाच बाळासाहेबंकडून व्यावसायिक वृत्ती संदर्भात शिकण्यसारखे आहे. "

  • "बाळासाहेब आपटे हे आदर्श गुरू होते. "अभाविप'च्या काळापासून आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले. ते मोजकेच, पण अर्थपूर्ण बोलत. एक कुशल संघटक व उत्कृष्ट रणनीतीकार म्हणूनही बाळासाहेबांची ओळख होती."

  • "अभाविप'मधील पिढीचा मी एक प्रतिनिधी असल्याने बाळासाहेबांच्या जाण्याने जाणवणारे पोरकेपण मी अनुभवतो आहे. ते केवळ व्यक्तीचे नाव नव्हते, तर स्वतःच एक संस्था होते. राजकीय क्षेत्रातील सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील."

  • "बाळासाहेब आपटे आपल्यासाठी मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक या तिन्ही भूमिकांतून सदैव प्रेरणादायी राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाचे व आपले व्यक्तिगत मोठे नुकसान झाले आहे."

  • "आपटे यांच्या निधनाने भाजपच्या मूळ विचारधारेशी समर्पित असलेल्या एका कर्मठ कार्यकर्त्याला आपण मुकलो आहोत. देशाच्या राजकारणात भाजपची ही भव्य इमारत उभी राहिली आहे, त्या इमारतीचा पाया भक्कम करणाऱ्यांत आपटे यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचे आपण विसरू शकत नाही, असे सांगून अडवानी म्हणाले, की देशाच्या राजकीय प्रवाहात भाजपला आज जे स्थान प्राप्त झाले आहे, त्यामागे आपटे यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा सहभाग व समर्पण आहे. संसदेत व संसदेबाहेरही त्यांच्या प्रत्येक शब्दांत पक्ष व संघटनेप्रति असलेल्या सच्च्या निष्ठेचे दर्शन घडत असे. "

  • "प्रा.बाळ आपटे एक संयमी आणि विद्वान खासदार म्हणून प्रसिध्द होते. विचारवंत म्हणून ओळख असलेल्या प्रा.आपटे यांनी राज्यसभेत अनेक महत्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. नामांकित विधीज्ञ म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून विद्यार्थ्यांचे संघटन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. मुंबई विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही लक्षणीय होती. त्यांच्या निधनाने एक अनुभवी राजकीय नेता आणि चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. "